बीड : कलेक्टर साहेबांच्या हाती झाडू तर सीईओंनी भिंती रंगवल्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून ‘या आपले शहर घडवूया’ या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल स्वच्छता अभियानाचा आज दूसरा टप्पा पार पडला. यावेळी अभियानात जिल्हाअधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार याच्यासह अधिकारी, कर्मचारी, शहरातील नागरिक, खेळाडू, खेळ संघटना, प्रशिक्षक व स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.

या उपक्रमात जिल्हा क्रीडा संकुलाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. क्रीडा संकुलामध्ये नियमित सरावाला येणाऱ्या विविध खेळाच्या शेकडो खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये संकुलामध्ये वावर असतो. क्रीडा संकुलामध्ये स्वच्छता अभियान राबवून ‘या आपले शहर घडवूया’ या उपक्रमा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी केलेला आहे.

२३ नोव्हेंबर २०१९ रोजी या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. आज या उपक्रमाचा दुसरा टप्पा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार उप – विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे, एन आय सीचे प्रमुख प्रविण चोपडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारा शाहदास दारखूलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, विविध सामाजिक व क्रीड़ा संघटनांचे पदाधिकारी, नागरिक व खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते.

आज स्वच्छतेचा दुसरा टप्पा पार पडला असून यात सकाळी ७ ते १० या वेळेमध्ये क्रीडा संकुलाची स्वच्छता मोहीम अंतर्गत इनडोअर हाॅल, पहेलीवन वस्तीगृह आदी पाण्याने स्वच्छ धुवून भिंतीवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. यावेळी बीड नगर परिषदे अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते.

Visit : Policenama.com