Kolhapur News : सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू; कोल्हापुर जिल्ह्यातील घटना

कोल्हापुर : पोलीसनामा ऑनलाइन – सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील बोरवडे (ता. कागल) येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

सुनिता काशीद असे स्फोटात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर रोजी सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत होत्या. यावेळी त्याच्यामध्ये सॅनिटायझरची बाटलीदेखील होती. त्यात शिल्लक असणाऱ्या सॅनिटायझरमुळे बाटलीचा स्फोट झाला आणि सुनीता काशीद आगीत होरपळल्या. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एकीकडे कोरोनामुळे सॅनिटायझर लोकांच्या आयुष्याचा नित्याचा भाग झाला आहे. तर दुसरीकडे अशा घटनेमुळे स्थानिक लोकामध्ये भीतीच वातावरण आहे.