धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीकडून ‘हे’ दाखल करणार उमेदवारी अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून विजय मिळवला. त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होत असून राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेसाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय दौंड हे उमेदवार असणार असून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर उमेदवारी मिळालेले संजय दैंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव आहे. पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते काँग्रेसमध्ये असून शरद पवार यांनी बीड विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे शरद पवार यांनी आता विधान परिषदेसाठी संजय दौंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढावी यासाठी शरद पवार आग्रही आहेत. संजय दौंड यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यामागचे हेच कारण असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दौंड हे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्यांचा स्थानिक पातळीवरील जनसंपर्क दांडगा आहे. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून राजन तेलींना उमेदवारी
धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आपली चुलत बहिण आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. धनंजय मुंडे यांच्या विजयाने रिक्त जागेवर निवडणूक होत आहे. भाजपने या निवडणुकीसाठी राजन तेली यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे निश्चित झालं आहे.

फेसबुक पेज लाईक करा –