सलग चौथ्यांदा विजय मिळवत भाजपच्या संजय धोत्रेंचा विक्रम ; जाणून घ्या विधानसभा निहाय मतदान

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन –अकोल्यात सलग चौथ्यांदा विजय मिळवत संजय धोत्रे यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यासोबतच सर्वाधिक मताधिक्य आणि मतांचाही विक्रम करत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर आणि अकोला येथून निवडणूक लढली. त्यामुळे अकोल्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांना आघाडी मिळत गेली. त्यातील ४ मतदारसंघ भाजपकडे तर १ कॉंग्रेस आणि १ भारिप बहुजन महासंघाकडे आहे. त्यात अकोला पुर्व विघानसभा मतदारसंघात त्यांना सर्वाधिक सर्वाधिक १,११,११५ मतं मिळाली. तर काॅंग्रेस आणि भारिपच्या ताब्यात असलेल्या मतदासंघांतही त्यांना आघाडी मिळत गेली. संजय धोत्रे यांनी तब्बल २,७५, ५९६ मतांनी विजय मिळवला.

विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी

मतदारसंघ भाजप काॅंग्रेस वंचित
अकोला पुर्व १,११,११५ ६१,७१२ २०,८६७

रिसोड ९५,७०५ ४४,४०० ३९,५८३

अकोट ९६,७०६ ३९,१७७ ४४,४९५

बाळापूर ८०, ४८८ ५६,४८८ ४८,०६१

मुर्तीजापुर ९०,११५ ५२,२३० ३७,४५०

अकोला पश्चिम

प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाची कारणे

– एमआयएमशी केलेली युती ओबीसींना आवडलेली नाही

– नवमतदाराला आकर्षित करता आले नाही

– तळागाळात, ग्रामीण भागात प्रभाव परंतु शहरी मतदारांवर प्रभाव नाही

संजय धोत्रेंच्या विजयाची कारणे

– मजबूत नेटवर्क, मतदारसंघावर पकड

– रिझल्ट आरियन्टेड कार्यशैली

– भाजपचा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजय

– नकारात्मक लाट निर्माण न होऊ देण्याची घेतलेली दक्षता

– काॅंग्रेसचा मुस्लीम उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीची एमआयएमसोबतची युती यामुळे झालेल्या मतविभाजनाचा फायदा