संजूबाबाचा स्वॅब रिपोर्टही आला निगेटिव्ह !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्तला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोरोनाची पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती. आता स्वॅब चाचणीचा अहवालही समोर आला असून तोही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

बॉलिवूडमध्ये सिने कलाकारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच संजय दत्तला काल संध्याकाळी अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अँटिजन्स चाचणी घेण्यात आली होती. त्यात कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. तरी खबरदारी म्हणून संजय दत्तची स्वॅब टेस्ट घेतली होती. आज सकाळी स्वॅबचा रिपोर्ट आला आहे. यात कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता श्वसनाचा त्रास नेमका का होतो याबाबत डॉक्टर उपचार देत आहेत. संजय दत्तची प्रकृती स्थिर आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक व ऐश्वर्या बच्चनसह त्यांची मुलगी आराध्या यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like