Sanjay Dutt And Manyata Dutt | पत्नी मान्यता बरोबर रोमँटिक डान्स केल्याने संजय दत्त झाला ट्रोल

पोलीसनामा ऑनलाईन : Sanjay Dutt And Manyata Dutt | बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. आज संजय दत्त लग्नाचा 15 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संजय दत्त आणि मान्यता अमिताभ बच्चन यांच्या ‘कालिया’ चित्रपटातील ‘तुम साथ हो जब अपने’ या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. मात्र या डान्समुळे संजय दत्त यांना नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे. (Sanjay Dutt And Manyata Dutt)

Advt.

हा व्हिडिओ शेअर करताना मान्यताने कॅप्शनमध्ये लिहिलं, “21 वर्षे झाली… आम्ही चुका केल्या, आम्ही माफी मागितली, एकमेकांना दुसरी संधीही दिली, एकमेकांना माफ केलं, आम्ही मज्जा मस्तीही केली. आम्ही खूप ओरडलो, आम्ही हिंमतही ठेवली आणि प्रेमही केलं. लग्नाच्या 15 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!” असे लिहिले आहे. (Sanjay Dutt And Manyata Dutt)

मान्यता दत्तने शेअर केलेल्या या पोस्टवर संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्तनेही कमेंट केली आहे.
“लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा” अशी कमेंट तिने या पोस्टवर केली आहे.
त्रिशालाच्या या कमेंटवर मान्यतानेही रिप्लाय दिला आहे.
“धन्यवाद माय लव्ह, तुझी खूप आठवण येते.” असा रिप्लाय मान्यता दत्तने दिला आहे.
तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मान्यताच्या या पोस्टवर कमेंट करत या दोघांना लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मात्र संजय दत्त यांना या डान्सवरून नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “तो मान्यताला किती जोरात धक्का देत आणि किती जोरात स्वतःकडे खेचत आहे.
हा कसला डान्स आहे?” दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिलं, “हे दोघंही जरा जास्तच नशेत आहेत असं वाटत नाही का?” तर आणखी एका युजरने, “असं वाटतंय की संजय दत्त फारसा डान्स करण्याच्या मूडमध्ये नाही असं दिसतंय” अशी कमेंट केली आहे. अशा एक ना अनेक कमेंट करत त्यांनी संजय दत्तला ट्रोल केले आहे.

Web Title :- Sanjay Dutt And Manyata Dutt | sanjay dutt romantic dance with wife manyata dutt netizens troll after viral video