वडिल सुनील दत्तच्या 15 व्या पुण्यतिथीला भावूक झाला संजय दत्त ! व्हिडीओ शेअर करत म्हणतो…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार संजय दत्तचे वडिल सुनील दत्त यांची आज(सोमवार दि 25 मे) 15 वी पुण्यतिथी आहे. वडिलांची आठवण काढत संजय दत्त भावूक झाला आहे. संजयनं सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. संजयनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्याच्या वडिलांसोबत त्याचे अनेक फोटो दिसत आहेत.

खास फोटोंनी तयार केला व्हिडीओ
संजयनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात संजयच्या लहानपणापासून ते सिल्वर स्क्रिन पर्यंतचे अनेक फोटो आहेत जे त्यानं वडिल सुनील दत्तसोबत काढले आहेत. व्हिडओ शेअर करताना संजयनं खास कॅप्शनही दिलं आहे. संजय म्हणतो, “जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत  मला माहिती होतं की मला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. नेहमीच मला साथ दिल्याबद्दल धन्यवाद. मिस यु डॅड.”

सुनील दत्त यांचं हार्ट अटॅकमुळं निधन झालं होतं. निधनाच्या अवघ्या 12 दिवसांनंतर 6 जून रोजी त्यांचा 76 वा वाढदिवस होता. संजयनं शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजयची इमोशनल पोस्ट पाहून अनेक चाहतेही भावूक झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like