संजय दत्तनं कॅन्सरला हरवलं : 61 वर्षांच्या अभिनेत्याचा कॅन्सर बरा झाला, 2 महिन्यांपूर्वी होती चौथी स्टेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता संजय दत्त चा कॅन्सर बरा झाला आहे. त्याचा जवळचा मित्र आणि ट्रेड अनालिस्ट राज बन्सल यांनी ही माहिती दिली आहे. दैनिक भास्करने कोकिळाबेन हॉस्पीटलने सुद्धा यासंदर्भात माहिती दिल्याचे म्हटले आहे. सायंकाळपर्यंत संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता सुद्धा अधिकृतपणे हे माहिती जाहीर करू शकतात.

सोमवारी 61 वर्षांच्या संजूबाबाचा पॉजिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) रिपोर्ट समोर आला, ज्यामध्ये तो कॅन्सरमुक्त आढळला आहे. पीईटी स्कॅन कॅन्सरची सर्वात विश्वसनीय चाचणी मानली जाते, त्यामध्ये समजते की, पीडित व्यक्तीच्या कॅन्सर सेल्सची स्थिती कशी आहे.

हॉस्पीटलशी संबंधीत सूत्रांनी सांगितले…
कॅन्सर सेल्समध्ये अन्य सेल्सच्या तुलनेत मेटाबोलिक रेट जास्त असतो. केमिकल अ‍ॅक्टिव्हिटीच्या या हाय लेव्हलमुळे कॅन्सर सेल्स पीईटी स्कॅनवर चमकणार्‍या डागांप्रमाणे दिसतात. या कारणामुळे पीईटी स्कॅन कॅन्सरचे निदान करण्यासाठी उपयोगी मानले जाते, सोबतच हेदेखील समजते की, कॅन्सर शरीरात किती पसरला आहे.

संजयने काही दिवसांपूर्वी म्हटले होते, मी यास हरवणार
काही दिवसांपूर्वी संजयचा एक व्हिडिओ सेलिब्रिटी हेयर स्टाइलिस्ट अलीम हाकिमने आपल्या सोशल मीडिया पेजवर शेयर केला होता. यामध्ये संजय दत्तने अलीमशी सर्वांची ओळख करून दिली होती आणि नंतर आपल्या कपाळावर आलेली निशाणी दाखवत म्हटले होते की, हे माझ्या जीवनातील आताचे निशाण आहे, पण मी यास हरवणार. मी कॅन्सरमधून लवकर बरा होईन.

संजय दत्तला 8 ऑगस्टला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, येथे काही टेस्ट करण्यात आल्या. तीन दिवसानंतर 11 ऑगस्टला संजयला लंग्ज कॅन्सर असल्याचे निदान झाले होते.