Sanjay Dutt Treatment : उपचारासाठी लवकरच न्यूयॉर्कमध्ये जाऊ शकतो संजय दत्त, ‘हे’ आहेत लेटेस्ट अपडेट

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आजकाल गंभीर आजाराशी झगडत देत आहे. काही दिवसांपूर्वी हे समजले आहे की, संजय दत्तला स्टेज 4 फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. आतापर्यंत आलेल्या वृत्तानुसार, संजय दत्त मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात या आजारावर उपचार घेईल. अलीकडेच संजूचे काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले होते ज्यात तो आपली पत्नी मान्यता दत्त, बहीण प्रिया आणि नम्रतासमवेत कोकिलाबेन रुग्णालयात जात होता. पैपराजीला पाहून संजय दत्त म्हणाला होता की, ‘प्रार्थना करा’.

View this post on Instagram

#yogenshah

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

आता अभिनेत्याच्या उपचारांशी संबंधित एक नवीन बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त आपला उपचार मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नाही तर न्यूयॉर्कला जाऊन करु शकतो, तो ही लवकरच. एका स्रोताने सांगितले की, “संजय दत्तने न्यूयॉर्कच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. तथापि, 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये सामील झाल्यामुळे संजय दत्तला व्हिसा मिळविण्यात अडचण येत होती. पण सुदैवाने संजय दत्तच्या मित्राने वैद्यकीय कारणास्तव पाच वर्षांच्या व्हिसासाठी मदत केली. संजय दत्त लवकरच मान्यता आणि बहीण प्रियासमवेत न्यूयॉर्कला रवाना होऊ शकेल. जिथे तो मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर येथे उपचार घेईल. संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांच्या स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा उपचारही या रुग्णालयात करण्यात आला होता.

11 ऑगस्ट रोजी संजयने वैद्यकीय उपचारांसाठी कामावरुन ब्रेक घेत असल्याची घोषणा करून अचानक सगळ्यांना धक्का दिला. संजयने चाहत्यांना काळजी करू नये असे सांगितले होते. यानंतर, त्याला स्टेज -4 फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची अफवा मिडियामध्ये सुरू झाली. मीडिया रिपोर्ट्समध्येही हा दावा केला गेला होता. नंतर मान्यता दत्त यांनी निवेदन प्रसिद्ध केले आणि चाहत्यांना आणि हितचिंतकांना सांगितले की, या टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना प्रार्थनेची आवश्यकता आहे आणि तुम्ही कोणत्याही अफवांच्या चक्करमध्ये पडू नये.