मान्यताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संजय दत्तने शेअर केली ‘इमोशनल’ पोस्ट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त 40 वर्षांची झाली आहे. संजयचं मान्यतावर किती प्रेम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. संजू बाबा सोशलवर नेहमीच आपले मान्यताप्रति प्रेम व्यक्त करत असतो. यावेळी संजू बाबाने मान्यताच्या वाढदिवसानिमित्त एक छानशी आणि इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. संजूने मान्यताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजूने इंस्टावर ही पोस्ट शेअर केली आहे.

मान्यता वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संजयने लिहिले की, “तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना नाही करू शकत. जन्मदिवसाच्या शुभेच्छा.” यावरूनही लक्षात येतं की, संजूचं मान्यतावर किती प्रेम आहे. संजू नेहमीच आपल्या फॅमिलीसोबत स्पॉट होत असतो. अनेकदा संजू मान्यतासोबत किंवा मुलांसोबतही दिसतो. कधी तो डिनर करताना दिसतो तर कधी फिरताना.

मान्यताचा जन्म 22 जुलै 1979 रोजी झाला आहे. मान्यता आता 40 वर्षांची झाली आहे. मान्यताने स्वत:ला खूप फिट ठेवले आहे. तिची फिगर पाहता अनेकजण तिच्या वयाचा अंदाज लावताना चुकतात. मान्यताही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मान्यताही आपले फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. मान्यता आणि संजूचे अनेक चाहते तिला सोशलवर फॉलो करतात.

सजू बाबाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, संजय दत्तकडे सध्या अनेक मोठे सिनेमे आहेत. यामध्ये शमशेरा, केजीएफ 2, प्रस्थानम या सिनेमांचा समावेश आहे. संजू आणि मान्यताच्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत. दोघे नेहमीच एकमेकांसोबत टाईम स्पेंड करताना दिसत असतात. त्यांचे फोटो पाहिले तरी त्यांच्यात किती बाँडिंग आहे हे लगेच लक्षात येते.