…म्हणून संजय दत्तने मुलगी त्रिशालाला नाही होऊ दिलं ‘हिरोईन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिने आपल्या इटालियन बॉयफ्रेंडच्या निधनाची इमोशनल पोस्ट शेअर केली होती. त्रिशाला बॉलिवूडमधील त्या स्टारकिडपैकी आहे जे लाईमलाईटपासून दूर असतात परंतु मीडियाचे फेवरेट आहेत. त्रिशालाने कोणताही फोटो शेअर केला की, तो क्षणातच व्हायरल होताना दिसतो. त्रिशालाही एखाद्या अॅक्ट्रेससारखीच ग्लॅमरस आहे. त्रिशालाचं एक सिक्रेट आज रिव्हील होणार आहे जे ऐकून तुम्ही कदाचित हैराण व्हाल.

Trishala

‘हिरोईन बनणं त्रिशालासाठी अवघड’ : संजय दत्त
संजय दत्तने सांगितले होते त्याची अशी इच्छा आहे की, त्रिशालाने पूर्णपणे आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. त्याचं म्हणणं आहे की, तिने फॉरेंसिक सायन्समध्ये चांगले शिक्षण घेतले आहे तर तिने यातच पुढे करिअर करावे. संजयचं असंही म्हणणं आहे की, त्रिशालाचं हिरोईन बनणं खूपच अवघड आहे. कारण यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदी भाषा येणं ही आहे. तिची अमेरिकन भाषेवाली हिंदी इथे चालणार नाही. तिला खूप मेहनत घ्यावी लागेल.

Trishala sanjay dutt

त्रिशालाला व्हायचं होतं अॅक्ट्रेस परंतु…
त्रिशाला संजय दत्त आणि त्याच्या पूर्वीच्या बायकोची मुलगी आहे. त्रिशाला परदेशात रहाते. तिला फिरायला आणि पार्टी करायला खूप आवडतं. त्रिशाला आपल्या वडिलांसारखीच दिसते आणि तिला आपले वडिल संजय दत्तसारखीच अॅक्टींग करायची आहे. त्यातच तिला करिअर करायचे होते. त्रिशाला अॅक्ट्रेस तर नाही होऊ शकली परंतु तिने अनेक फॅशन ब्रँडसाठी मॉडेलिंग केली आहे. तिचे काही फोटोशुट खूप व्हायरल झाले आहेत.

‘लुकमुळे त्रिशाला देते बॉलिवूड अॅक्ट्रेसला टक्कर ‘
त्रिशाला तिचे वजन मोठ्या प्रमाणात घटवले आहे आणि आता ती खूपच स्लिम झाली आहे. याआधी ती खूपच वेगळी दिसत होती. याआधी त्रिशाला तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. तिला पाहणारे अनेकजण म्हणतात की, त्रिशाला तिच्या लुकमुळे बॉलिवूडच्या अनेक अॅक्ट्रेसला टक्कर देत आहे.

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

आता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी

ही ‘आसने’ करतील कंबर ‘सडपातळ’ करण्यास मदत

काँग्रेसचे आमदार अमिता चव्हाणांच्या मतदार संघातच काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार