Video : ‘वर्ल्ड ड्रग डे’ निमित्त संजू बाबाने शेअर केला ‘खास’ व्हिडीओ ; पहा कशी होती त्याची हालत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा बाबा अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा संजू बाबा ड्रग्सच्या आहारी गेला होता. एक क्षणही त्याला ड्रग्सशिवाय राहवत नव्हते. ड्रग्सचे व्यसन सोडवण्यासाठी एक मोठी लढाई त्याला करावी लागली. नुकतंच वर्ल्ड ड्रग डे च्या निमित्ताने संजू बाबाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून संजू बाबाने लोकांना नशेपासून दूर राहण्यास सांगितले आहे. संजू बाबाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

संजू बाबाने व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले आहे की, “तुम्ही अशा लोकांपासून दूर रहा जे तु्म्हाला कोणतेही व्यसन करण्यासाठी उचकवत असतात. मी स्वत: ड्रग्सच्या आहारी गेलो होतो. या वेडेपणाबद्दल मी तुम्हाला आताच सावध करत आहे. अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यासोबत ड्रग फ्री इंडिया अभियानाची सुरुवात करणं माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. वर्ल्ड ड्रग डे निमित्त आपल्या अभियानाला पुढे नेऊयात.”

पुढे संजू बाबा म्हणतो की, “माझ्या पालकांनी मला जे काही सांगितलं मी त्याच्या एकदम उलट केलं. मी कधीच माझ्या शिक्षकांचंही ऐकलं नाही. माझ्या मनाचंही कधी ऐकलं नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव घेतला आहे. मीही तुम्हाला हे सांगेल की, तुम्हीही कोणाचं ऐकू नका.”

पुढे संजय दत्त म्हणतो की, “जर तुमचा मित्र तुम्हाला म्हणाला की, यामुळे तुझे कोणतेही नुकसान होणार नाही तर त्याचे कधीच ऐकू नका. जर तुमचा मित्र म्हणाला की, सगळे ड्रग्स घेतात तर त्याचे ऐकू नका. कोणत्याही मित्राचे ऐकू नका. मला सत्य माहीत आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे. आज तुम्ही शपथ घ्या की, कधीच ड्रग्स घेणार नाही. याशिवाय कोणी जर ड्रग्स घेत असेल तर त्यालाही तुम्ही रोखलं पाहिजे.”

संजयला यातून बाहेर पडताना पडण्यासाठी १० वर्षे लागली हे सांगताना संजय दत्त म्हणाला की, “मी नशीबवान आहे की मी यातून बाहेर पडलो आहे. ड्रग्सपासून मुक्ती मिळवण्यासाठी रिहॅब सेंटर एक चांगलं ठिकाण आहे. मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा त्यांनी माझा पासपोर्ट घेतला होता. ते मला खूप समजावून सांगत असत परंतु त्या सगळ्यापासून दूर पळत होतो. मी माझ्या काऊंसलरला सांगितलं होतं की, एक माणूस माझ्या स्वप्नात आला आणि तो मला म्हणत होता की, घरी निघून जा. त्याने मला हेही सांगितले होते की, तू २ वर्ष येथेच राहशील.”

‘या’ अभिनेत्रीला मिळतात केवळ ‘बार डान्सर’ आणि ‘लोकांगना’चे रोल

Video : अभिनेत्री कंगनाने ‘तेरे जिस्म २’ गाण्यावर दाखवला बोल्ड ‘अवतार’

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’

भावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण

चणे खा आणि ‘या’ गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवा

वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर