लोकसभा 2019 : बहिणीसाठी संजय दत्त सरसावला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता संजय दत्त हा आपली बहिण प्रिया दत्त हिच्या प्रचारात आता उतरला असून त्याने प्रचार फेरीत भाग घेऊन प्रिया दत्त हिला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्याने चक्क हात जोडून मतदारांकडे मतांची मागणी केली. मी अभिनेता म्हणून नाही तर एक भाऊ म्हणून माझ्या बहिणीसाठी तिचे मनोबळ वाढविण्यासाठी प्रचारात सहभागी झालो असल्याचे संजय दत्त याने सांगितले.

मुंबईत चौथ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. अभिनेता संजय दत्त प्रिया दत्तच्या प्रचारात सध्या व्यस्त आहे. काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांनी सोमवारी मुंबईतील वांद्रे परिसरात प्रचार करत होत्या. त्यांचे मनोबळ वाढविण्यासाठी अभिनेते संजय दत्त सहभागी झाले होते.