संजय दत्त करत होता एकावेळी ‘इतक्या’ मुलींना डेट

पोलीसनामा ऑनलाईन टीम : संजय दत्तचे खाजगी आयुष्य कसे होते हे आपण संजू चित्रपटात पहिले आहेच. या चित्रपटाद्वारे संजय दत्तविषयी त्याच्या फॅन्सना अनेक धक्कादायक आणि मनोरंजक माहिती मिळाली होती. प्रचंड चाललेल्या या चित्रपटात त्याच्या अनेक प्रेयसी होत्या हेदेखील दाखवले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने दिलेल्या एका मुलाखतीत एकावेळी एक नव्हे तर एकाचवेळी तीन तो मुलींना डेट करत होता अशी कबुलीवजा माहिती त्याने दिली होती.

इंडिया टुडेला दिलेल्या या मुलाखतीत त्याला ‘तू कधी दोन मुलींना एकत्र डेट केले आहेस का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्याचे उत्तर धक्कादायक असे होते. संजयने उत्तर दिले होते की, मी एकावेळी दोन नव्हे तर तीन मुलींना एकत्र डेट केले होते. मात्र मी एकावेळी तीनजणींना डेट करत आहे याची कल्पना या तिघींना देखील नव्हती. ‘तुम्ही खूप स्मार्ट असाल आणि एकीला दुसरीसोबत काय सुरू आहे याची माहिती नसेल तर तुम्ही असे नक्की करू शकता’ अशी टिपच त्याने युवकांना दिली होती.

या मुलाखतीवेळी संजयच्या प्लेबॉय इमेजविषयी देखील विचारण्यात आले होते. ‘लोकांनी तुमच्यावर प्रेम केलेले नक्कीच तुम्हाला आवडते आणि त्यातही महिला तुमच्यावर प्रेम करत असतील तर ते तुम्हाला अधिक आवडते’ असे उत्तर त्याने यावर दिले होते.

आता असे आहे संजयचे वैवाहिक जीवन

संजयचे पहिले लग्न रिचा शर्मासोबत झाले होते. त्रिशाला ही संजय आणि रिचा यांची मुलगी असून रिचाच्या निधनानंतर काही वर्षांनंतर त्याने रिया पिल्लईसोबत लग्न केले. पण हे लग्न काहीच वर्षं टिकले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मान्यता त्याच्या आयुष्यात आली. संजय आणि मान्यता यांनी काहीच वर्षांच्या नात्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुले देखील आहेत. तो त्याच्या आयुष्यात आनंदी आहे.

आरोग्यविषयक वृत्त