Video : संजय दत्‍त निर्मित ‘बाबा’ चित्रपटात ‘दबंग २’ मधील दीपक डोब्रियालचा अभिनय, चित्रपटाचा टीजर रिलीज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांनी निर्माती केलेला चित्रपट ‘बाबा’ याची चर्चा प्रचंड होत आहे. या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. हा टीजर पाहून असे कळते की, यामध्ये एका वडिल आणि मुलाची सुंदर कथा दडलेली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संजय दत्त आणि मान्यता दत्त यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे. संजय दत्त यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे पण एक निर्माता म्हणून त्याचा हा पहिला चित्रपट आहे.

या पोस्टरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेत बालकलाकार आर्यन मेंघजी हा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर. गुप्ता यांनी केले आहे. त्यांनी ‘धागा’ या लघुपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात नंदिता पाटकरसुद्धा दिसणार आहे. संजय दत्त आणि मान्यता यांच्या ‘बाबा’ चित्रपटामध्ये ‘तनु वेडस् मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ मधील अभिनेता दिपक दोब्रीयाल याची प्रमुख भूमिका असणार आहे. हा चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांनी ट्विटरवरुन टीजरबद्दल बोलताना सांगितले की, ‘हा आमचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचा टीजर आम्ही प्रदर्शित केला आहे.’ ‘मान्यता दत्त म्हणाल्या की, ‘बाबा’ हा टीजर निरागसतेची अत्यंत सुंदररित्या विणलेली कथा आहे. असे ट्विट केले आहे. ‘

या चित्रपटाचे दिग्दर्शक राज.आर. गुप्ता यांनी सांगितले की, ‘माझे असे ठाम मत आहे की, भावनांना भाषा नसते. हा संदेश चित्रपटातील कलाकारांनी अगदी सुंदरित्या अधोरेखित केला आहे. एक कुटूंब सर्व आव्हानावर मात करण्यासाठी कशाप्रकारे धडपड करत असतात, याची ही कथा आहे. ‘

या चित्रपटाची सह-निर्मिती संजय एस दत्त प्रोडक्शनच्या बॅनरखाली अशोक आणि आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ बरोबर केली आहे. ‘ब्ल्यू मस्टँगने याआधी ‘बकेट लिस्ट’माधुरी दिक्षितच्या चित्रपटाची निर्मिती केली होती.

अशोक यांनी सांगितले की, ‘ , ‘या चित्रपटाच्या मनिष सिंगने लिहिलेल्या मूळ कथेला राज गुप्ता यांचे उत्तम दिग्दर्शन लाभले आहे. .’


दरम्यान, संजय दत्‍तच्या या चित्रपटामध्ये बॉलिवूडमध्ये वेगळा वलय निर्माण करणारा दीपक डोब्रियाल आता मराठी सिनेमात आपल्या अभिनयाची चमक दाखविणार आहे. दबंग 2, तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो आणि ओमकारा या हिंदी चित्रपटांमध्ये दीपकने त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बाबा या मराठी चित्रपटात देखील दीपक उत्‍तम अभिनय करेल याबाबत कोणालाच शंका नाही.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप