Sanjay Gaikwad | मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदारांची नाराजी उघड; आमदाराच्या वक्तव्याने चर्चेला उधान

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन : शिंदे-फडणवीस सरकारला लवकरच सहा महिने पूर्ण होतील. तरी पण या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होत नाहीये असे चिमटे राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाने काढले होते. तसेच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देखील मंत्रीमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाच्या आणखी एका आमदाराने (Sanjay Gaikwad) मंत्रीमंडळ विस्ताराबाबत नाराजी व्यक्त केल्याचे उघड झाले आहे. (Sanjay Gaikwad)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार करावा अशी मागणी शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर शिंदे गटात कुजबूज सुरू झाली आहे.

 

शिंदे गटातील आमदारांना आता मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. काल दि.७ बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी मंत्रीमंडळ विस्तार हा २२ जानेवारीपर्यंत होईल असे म्हटले होते. तर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी देखील मंत्रीमंडळ विस्तार लवकर करावा अशी मागणी केली आहे. मंत्रीमंडळ विस्तार गेल्या ४ महिन्यांपासून लांबला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार करावा अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही.
तसेच आमदारांमध्ये नाराजी आहे आणि हे सरकार लवकरच पडेल असे वक्तव्य केले होते.
त्यावर संजय गायकवाड यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला.
संजय गायकवाड म्हणाले, ‘हे सरकार २०२४ पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण करेल.
शिवाय २०२४ ते २०२९ पर्यंत पुन्हा हेच सरकार येईल. आणि त्या सरकारमध्ये आम्ही असू.’
असा विश्वास यावेळी बोलताना संजय गायकवाड यांनी व्यक्त केला.

 

Web Title :- Sanjay Gaikwad | mlas from the shinde group are upset because of the delay in the expansion of the cabinet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक