Sanjay Kakade At Devendra Fadnavis Sagar Bungalow | देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर संजय काकडेंचे गणपतीला साकडे!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Kakade At Devendra Fadnavis Sagar Bungalow | सध्या सर्वांचा आवडता गणपती बाप्पाचा गणेशोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावरील गणपतीचे माजी खासदार संजय काकडे यांनी दर्शन घेतले आणि महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि समृद्ध ठेव म्हणून श्री गणरायाच्या चरणी साकडे घातले. (Sanjay Kakade At Devendra Fadnavis Sagar Bungalow)

गणेशोत्सवानिमित्त अनेक मान्यवर दिग्गज नेते आणि सेलिब्रिटींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आहे. आज माजी खासदार संजय काकडे हे देखील सागर बंगल्यावर आरतीला उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी गणपतीची आरती केली आणि आरतीनंतर बाप्पाचे दर्शन घेतले. सर्व जनतेच्या कल्याणाकरिता त्यांनी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. (Sanjay Kakade At Devendra Fadnavis Sagar Bungalow)

माजी खासदार संजय काकडे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नुकत्याच अमृता फडणवीस येऊन गेल्या होत्या तर,
आज संजय काकडे त्यांच्या मुंबईतील घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले.

महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे यासोबतच महाराष्ट्राची भरभराट होऊ दे अशी प्रार्थना
माजी खासदार संजय काकडे यांनी श्री गणरायाच्या चरणी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Traffic Changes | सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल

Chandrashekhar Bawankule | बावनकुळेंचे पवार-ठाकरेंना आव्हान, ‘उदयनिधींच्या विधानाला समर्थन असावे, मान्य असेल तर…’