Sanjay Kakade | संजय काकडेंची नाराजी दूर करण्याचे भाजपाचे प्रयत्न, आशिष शेलारांनी घेतली भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Kakade | पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha Election 2024) महायुतीचे (Mahayuti) भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे. भाजपाचे सर्व स्थानिक नेते त्यामध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहेत. मात्र, भाजपा नेते संजय काकडे अजूनही प्रचारात सहभागी झाल्याचे दिसत नाहीत. त्यामुळे काकडे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, ही नाराजी दूर करण्यासाठी काल रात्री भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी काकडे यांची भेट घेऊन मनधरणी केल्याचे वृत्त आहे.(Sanjay Kakade)

भाजपा नेते आशिष शेलार हे काल पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी नाराज भाजपा नेते संजय काकडे यांची भेट घेतली. शेलार यांनी या भेटीत काकडेंना प्रचारात सहभागी होण्याची विनंती केल्याचे समजते. तसेच काकडे यांनीही मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे, शेलार यांना सांगितले आहे.

नुकतेच संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेली फूट आणि दुभंगलेल्या पवार कुटुंबियांतील (Pawar Family) बिघडलेल्या संबंधावरून दुख व्यक्त केले होते. पवार कुटुंबियांनी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. परंतु, ही फूट भाजपाने पाडलेली नाही, असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, संजय काकडे पक्षापासून अलिप्त राहात असल्याचे जाणवल्याने काल रात्री आशिष शेलार यांनी त्यांच्या निवासस्थनी जाऊन भेट घेतली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar On Baramati Lok Sabha | भाजपा नेते आशिष शेलार यांनी बोलता-बोलता एक मोठी चूक केली; म्हणाले… (Video)

Supriya Sule | …ही आहे शरद पवारांची ताकद ! न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात

Amit Shah On Ajit Pawar | भाजपासोबत गेल्याने अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशा थांबल्या का? अमित शहा म्हणाले…

Pune Lok Sabha Election 2024 | गाजावाजा न करता वसंत मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वांनाच वाटले आश्चर्य