Sanjay Kakade | डॉ बाबा आढाव व शालिनीताई आदर्श पती-पत्नी! बाबांचे कर्तृत्व शालिनीताईंच्या अतूट साथीमुळेच; माजी खासदार संजय काकडे यांचे गौरवोद्गार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Kakade | क्षेत्र कोणतंही असो… तिथं महिलेचं योगदान हे अमूल्य असतं. अगदी ऐतिहासिक काळापासून आपण बघितलं तरी हे लक्षात येईल. छ्त्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) घडविण्यात जिजाऊ माँ साहेबांचा (Rajmata Jijau Masaheb) जसा वाटा आहे तसाच महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या कार्यात सावित्रीबाईंनी अनमोल अशी सोबत केली. आणि आजचं उदाहरण द्यायचं झालं तर सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेले डॉ. बाबा आढाव (Baba Adhav) यांच्या वाटचालीत त्यांची पत्नी शालिनीताई (Shalinitai Adhav) यांचा देखील वाटा अतिशय महत्वाचा आहे. अगदी शालिनीताई यांच्या सोबतीमुळे व सहकार्यामुळेच बाबा इतकं भरीव काम करू शकले, असे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी काढले.

 

संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे (Usha Kakade) यांच्या ग्रॅव्हिटस फाउंडेशन संस्थेच्या (Gravittas Foundation) वतीने पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन शालिनीताई यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव, ज्येष्ठ विचारवंत डॉ सदानंद मोरे (Dr Sadanand More), ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापक उषा काकडे, सिंबायोसिस च्या (Symbiosis International University) विद्या येरवडेकर (Dr. Vidya Yerawadekar), ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी (Senior journalist Pratima Joshi), अरुण खोरे (Senior journalist Arun Khore) आदी मान्यवर उपस्थित होते. (Sanjay Kakade)

संजय काकडे म्हणाले की, डॉ बाबा आढाव यांच्या कार्याचे महत्त्व खूप आहे.
आणि ते महत्व अधोरेखित करताना त्यांच्या पत्नी शालिनीताई यांची नोंद अत्यंत आवश्यक आहे.
शालिनीताई यांच्या योगदानामुळेच त्यांना सन्मानित करणे विशेष आनंदाचे आहे.
डॉ बाबा आढाव आणि शालिनीताई हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी आदर्श असं जोडपं आहे.
जीवनात पती व पत्नीने एकमेकांच्या साथीने यशस्वी आयुष्य कसं जगावं हेच या दोघांकडे पाहिल्यावर समजतं.
डॉ बाबा आणि शालिनीताई या दोघांना उत्तम आरोग्य मिळो.

 

Web Title :- Sanjay Kakade | Dr. Baba Adhaav and Shalinitai ideal husband and wife! Baba’s achievements were due to Shalinitai’s unwavering support; Tribute to former MP Sanjay Kakade

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | बारामती तालुक्यातील खांडजमध्ये गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा दुर्देवी मृत्यू, पिता-पुत्राचा समावेश

Dhankawadi, Pune News | नॅशनल चॅम्पियन जिमनँस्ट साहिल मरगजेचा महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने गौरव

Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार