संजय काकडेंची व्याह्यांमार्फत मनधरणीचे भाजपकडून प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपमध्ये नाराज असलेले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा जाहीर होताच, भाजपकडून त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांचे व्याही सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली आहे. आज सायंकाळी संजय काकडे, सुभाष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर बैठक सुरु आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

खासदार काकडे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी प्रचंड मेहनत घेतली होती. भाजपचे नगरसेवक मोठया प्रमाणावर निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासुन त्यांचा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून सन्मान राखला जात नव्हता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना देखील दिली होती. अद्यापही त्यावर निर्णय न झाल्यामुळे अखेर खासदार संजय काकडे यांनी भाजप साडेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.

संजय काकडे यांची मनधरणी करण्यासाठी सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली आहे. आज या तिघांमध्ये वर्षा बंगल्यावर चर्चा सुरु असून या बैठकीत संजय काकडे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश येते का हे पहावे लागेल. भाजपला नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी नात्यांचाही आधार घ्यावा लागत आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

पाणी रोखण्यावरून पाकिस्तनाने दिली भारताला धमकी

आत्महत्येप्रकरणी ‘त्या’ पोलिसांची वरिष्ठांकडून चौकशी सुरु

बस प्रवाशांच्या बॅगा आणि किंमती ऐवज लंपास करणारा सराईत अटकेत

सरकारच्या ‘या’ दडपशाही विरोधात काश्मीरी वृत्तपत्रांचे अनोखे आंदोलन