जावडेकरांना घराच्या शेजारीही कोणी ओळखत नाही; काकडेंचा जावडेकरांवर पलटवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजप खासदार संजय काकडेंवर खरमरीत टीका केली. त्यावर संजय काकडेंनी प्रकाश जावडेकरांवर पलटवार केला आहे. ज्यांच्या मागे पाच कार्यकर्तेही नाहीत, अशा जावडेकरांना मंत्रि‍पदाची बंपर लॉटरी लागली आहे. त्यांच्या घराच्या शेजारीही त्यांना ओळखत नाही, अशी खरमरीत टीका काकडेंनी जावडेकरांवर केली.

पाच कार्यकर्ते मागे नसलेल्या प्रकाश जावडेकरांना तर बंपर लॉटरी लागली. घराच्या शेजारीही जावडेकरांना कुणी ओळखत नाही.2019 च्या निवडणुकीत त्यांना कळेल मटका की सर्व्हे आहे. जावडेकर एक नगरसेवकही निवडून आणू शकले नाहीत. कार्यकर्तेही घडवू शकले नाहीत. मात्र, यानंतरही जावडेकर यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं आहे. ही तर बंपर लॉटरी आहे, असं संजय काकडेंननी म्हटलं.

तसंच, देशाला आणि राज्याला प्रकाश जावडेकरांनी पक्षासाठी केलेला त्याग  माहिती आहे, अशी कोपरखळीही काकडेंनी जावडेकरांना मारली आहे.

दरम्यान, संजय काकडेंनी लोकसभा निवडणुकीबाबत केलेल्या भाकीतांवर मी विश्वास ठेवत नाही. एकदा मटका लागला म्हणजे सारखा लागत नाही, अशी टीका प्रकाश जावडेकर यांनी संजय काकडेंवर केली होती.