संजय कोठारी ‘मुख्य दक्षता’ आयुक्त तर ‘मुख्य सूचना’ आयुक्तपदी बिमल जुल्का

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या जागेसाठी मोठा अधिकारी मिळाला आहे. मुख्य दक्षता आयुक्तपदी संजय कोठारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मुख्य दक्षता आयुक्त पद गेल्या जून २०१९ पासून रिक्त होते.

बिमल जुल्का हे मुख्य सूचना आयुक्त होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. संजय कोठारी हे सध्या राष्ट्रपती कोविंद यांचे सचिव आहेत. संजय कोठारी हे हरियाना केडरच्या १९७८ बॅचचे अधिकारी आहेत. तर , बिमल जुल्का हे मध्य प्रदेश केडरचे १९७९ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.