संजय लाठकर यांना केंद्रीय गृहमंत्रालया द्वारे देण्यात येणारे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

रांची : वृत्तसंस्था – पुण्यासह महाराष्ट्रात विविध पदावर काम केलेले पोलीस महानिरीक्षक संजय आनंदराव लाठकर यांना सीआरपीएफच्या ८१ व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालया द्वारे देण्यात येणारे उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

झारखंड केडरचे संजय लाठकर हे १९९५ च्या बॅचचे अधिकारी आहे. सध्या ते सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. लाठकर यांनी आपल्या २४ वर्षाच्या कार्य काळात बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि सीआरपीएफमध्ये विविध ठिकाणी काम केले. यापूर्वी त्यांना पोलीस वीरता पदक, मुख्यमंत्री झारखंड वीरता पदक, महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाद्वारे दिला जाणारा महात्मा गांधी शांती सन्मान, आंतरिक सुरक्षा पदक आणि पोलीस पदक सन्मान मिळाला आहेत.

त्यांना आतापर्यंत बिहार, झारखंड, महाराष्ट्र व मध्य प्रदेश तसेच भारतीय सेनाद्वारे ६० प्रशस्ती पत्राने सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसमध्ये त्यांनी पुण्यातही काम केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त