Birthday Special : संजय लीला भन्साळी आणि ‘विवादां’चं ‘अतुट’ नातं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये भव्यतापूर्ण आणि शानदार सेटसोबतच आपल्या अप्रतिम दिग्दर्शनासाठी डायरेक्टर संजय लीला भन्साळी ओळखले जातात. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1964 रोजी झाला आहे. आपल्या सिनेमांसोबतच ते अनेक विवादांसाठीही ओळखले जातात. त्यांचं विवादासोबत गहिरं नातं आहे. आपण त्यांच्याच काही विवादांबद्दल जाणून घेणार आहोत.

नेहमीच काहीतरी वेगळं करणारे संजय लीला भन्साळी ‘भारतीय फिल्म अँड टेलीव्हिजन इंस्टीट्युट’चे विद्यार्थी आहेत. ‘1942-अ लव स्टोरी’ या सिनेमापासून भन्साळींनी आपल्या आईला श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या नावात लीला लिहिण्यास सुरुवात केली. डायरेक्टर विधु विनोद चोप्रांसोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. जाणून घेऊयात त्यांच्या काही विशेष सिनेमांविषयी.

1) हम दिल दे चुके सनम –
1999 साली आलेला हा सिनेमा तेव्हाचा हिट सिनेमा ठरला. सलमान खान आणि ऐश्वर्याच्या अफेअरच्या चर्चांमुळं हा सिनेमा यशस्वी झाला. सलमानमुळंच ऐश्वर्याला हा सिनेमा मिळाला होता. दोघांची केमिस्ट्री सर्वांनाच खूप आवडली होती.


2) देवदास –

2002 साली आलेला हा सिनेमा बॉलिवूडमधील महाग सिनेमांमध्ये धरला जातो. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या रॉय स्टारर हा सिनेमा रिलीज होताच खूप चर्चेत आला होता. या सिनेमातील शाहरुखची अ‍ॅक्टींग पाहून प्रत्येक जण त्याचा चाहता झाला होता. भन्साळींच्या भव्य सिनेमांपैकी एक हा सिनेमा आहे. या सिनेमानं 5 नॅशनल अवॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

3) गोलियों की रासलीला रामलीला –
हा सिनेमा आपल्या टायटलमुळं प्रचंड वादात सापडला होता. 2012 साली आलेल्या या सिनेमाच्या नावात बदल करण्यात आला आहे. या सिनेमात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण लिड रोलमध्ये होते.

https://www.instagram.com/p/B8hUFORjSnT/

4) पद्मावत –
2018 साली आलेल्या या सिनेमामुळेही संजय लीला भन्साळींना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. करणी सेनेनं या सिनेमाच्या नावाला जोरदार विरोध केला होता. यानंतर ‘पद्मावती’ सिनेमाचं नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आलं होतं. या सिनेमामुळं एअरपोर्टवर त्यांच्यावर हल्लाही झाला होता. पद्मावत सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला. सिनेमानं खूप कमाई केली.