सलमान – शाहरुख संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटात एकत्र

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडचे सुपर स्टार सलमान आणि शाहरुख ला एकत्र पडद्यावर पाहण्या सारखा दुसरा कुठला आनंद त्यांच्या चाहत्यांसाठी नसणार. जेव्हापासून सलमान आणि शाहरुख खान यांच्या मधील भांडण मिटली आहे. तेव्हा पासून त्यांचे चाहते करण -अर्जुन जोडीला एकत्र पडद्यावर बघण्यास उत्सुक आहे. सूत्रानुसार असे कळले आहे की हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहे.

एका वृत्तानुसार सलमान आणि शाहरूख दोघे एकत्र एका बिग बजेट सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी या दोघांनां घेऊन चित्रपट बनवणार आहे. यासाठी ते तयारीही करत असल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी लवकरच या चित्रपटाबाबतची घोषणा करणार आहेत.

दोघांना एकत्र चित्रपटात बघून अनेक वर्ष झाली आहे. सलमान आणि शाहरुखने करण-अर्जुन,कुछ कुछ होता है,हम तुम्हारे है सनम यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते. मध्यंतरी २०१७मध्ये सलमाच्या ‘ट्यूबलाईट’ चित्रपटात शाहरुखने केमियो केला होता. तर शाहरुखच्या ‘झिरो’चित्रपटातील एका गाण्यात सलमान दिसला होता.

संजय लीला भन्साळी यांच्या बरोबर सलमानने खामोशी : द म्‍यूज‍िकल (१९९६) आणि १९९९मध्ये ‘हम द‍िल दे चुके सनम’ चित्रपट केले .तर शाहरुखने संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटात काम केले आहे.

You might also like