… म्हणून राज ठाकरे जाणता राजा, ‘या’ मराठी अभिनेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहुर्त साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पक्षाचे पहिले महाअधिवेशन मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानात आयोजित केले आहे. मनसेचा नवा झेंडा, त्यामधील निळा आणि हिरवा रंग काढून त्याऐवजी निवडलेला नवा भगवा रंग, त्यावरील राजमुद्रा आणि राज ठाकरे आज कोणती भूमिका मांडणार, अशा विविध कारणांमुळे हे अधिवेशन खुपच चर्चेत आहे. यावेळी राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे सक्रीय राजकारणात सगभागी झाले.

या महाअधिवेशनात चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि अभिनेते संजय नार्वेकर यांनी सांस्कृतिक महाराष्ट्र हा ठराव मांडला. संजय नार्वेकर यांनी राज ठाकरेंसोबतचा अनुभव व्यक्त केला. राज साहेबांनी मध्यमवर्गातून आलेल्या माझ्यासारख्या अनेक कलावंतांना स्वस्त दरात घरं मिळवित म्हणून पाठपुरावा केला. राज साहेब कायम मराठी कलावंताच्या पाठिशी उभे राहिले. मराठी माणसांसाठी लढणारा, त्यांची जाणीव असणारा हा जाणता राजा आहे, अशा शब्दात नार्वेकर यांनी राज ठाकरेंना धन्यवाद दिले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. १४ वर्षांनंतर मनसेचा महाअधिवेशन मेळावा होत आहे. या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये पहिल्यांदाच अमित ठाकरेंवर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

You might also like