मिलींद देवरांच्या राजीनाम्यानंतर संजय निरूपमांचा ‘घणाघात’ ; म्हणाले, ‘अशा ‘कर्मठ’ लोकांपासुन पक्षाने सावध रहावे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाचा मिलींद देवरा यांनी राजीनमा दिल्यानंतर संजय निरूपम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. निरूपम यांनी देवरा यांच्यावर घणाघात करत पक्षाने अशा कर्मठ लोकांपासुन सावध रहावे असे म्हंटलं आहे. निरूपम यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून हटवुन देवरा यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. चारच महिन्यात देवरा यांनी राजीनामा दिल्यानं निरूपम यांनी त्यांच्यावर जहरी टिका केली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजीनामा दिल्यानंतर देवरा हे काँग्रेस पक्षासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करू शकतात. देवरांच्या राजीनाम्यानंतर लगेचच निरूपम यांनी ट्टिरवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, राजीनाम्यात त्यागाची भावना दिसायला हवी, येथे तर राष्ट्रीय स्तरावरील पदाची मागणी होत असताना दिसत आहे. हा राजीनामा उच्च पदावर पोहण्याची एक सीडी आहे काय असे म्हणून त्यांनी पक्षाला अशा कर्मठ लोकांपासुन सावध राहण्यास सांगितले आहे.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी