काँग्रेसकडून संजय निरूपम यांना उत्‍तर-पश्‍चिममधून उमेदवारी तर मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष

नवी दिल्‍ली : पोलीसनाम ऑनलाइन – काँग्रेस पक्षाने संजय निरूपम यांना लोकसभेच्या मैदानात उतरविले असुन त्यांची उत्‍तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदार संघातुन उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसची धुरा मिलींद देवरा यांच्याकडे सोपविण्यात आली असुन त्यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाची सुत्रे देण्यात आली आहे.

काँग्रेसने राज्यातील जवळपास सर्वच (पुणे लोकसभा मतदार संघ सोडून) लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. काही जागांवरील (औरंगाबाद) उमेदवार बदलण्याबाबत काँग्रेस पक्ष श्रेष्ठी विचार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसने आज (सोमवार) संजय निरूपम यांना उत्‍तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदार संघातुन उमेदवारी दिली आहे. मुंबई काँग्रेसची जबाबादारी मिलिंद देवरा यांच्याकडे सोपविली आहे. पुणे लोकसभा मतदार संघाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही.