Sanjay Nirupam on Raj Thackeray | “सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा घरचा आहेर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Nirupam on Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज यांनी घेतलेल्या तिन्ही सभांमध्ये त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिवसेना आणि राष्ट्रवादीला (Shivsena-NCP) त्यांनी खास करून लक्ष्य केलं. औरंगाबादमधील (Aurangabad) सभेत त्यांनी काही अटींचं उल्लंघन केल्याचं सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

 

राज ठाकरे यांना सरकार घाबरलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर 1 मे ला औरंगाबादमधील सभेमध्ये ज्या अटी घालण्यात आल्या होत्या. त्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप संजय निरूपम यांनी केला आहे. त्यासोबतच निरूपम यांनी राज ठाकरे यांना अटक (Arrested) करण्याची मागणी केली आहे.

 

औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी 16 पैकी 12 अटींचं उल्लंघन केलं आहे.
त्यासोबतच त्यांच्याविरोधात दोन न्यायालयांचे अजामीनपत्र वॉरंट आहेत. मुंबई पोलीस (Mumbai Police) का काहीच करत नाही हे मला समजत नाही.
ठाकरे सरकारला राज यांची भीती वाटत आहे, असं निरूपम म्हणाले.

 

दरम्यान, देशात आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे.
जो कोणी कायद्याला आव्हान देईल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असंही निरूपम यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sanjay Nirupam on Raj Thackeray | government fears raj thackeray sanjay nirupam made serious allegations against his own government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा