रावसाहेब दानवेंनंतर आता ‘या’ नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील सभेत वादग्रस्त वक्तव्य केले. तुम्ही मला विजयी करण्यासाठी माझ्या मागे उभे राहा. मी तुम्हाला पैसे देईन असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनीही असंच काहीसं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आता वन रूम किचनच्या घरात राहण्याचे दिवस गेले आहे. मुंबईची लोकं वन बेडरूम हॉलमध्ये राहतीस. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आश्वासन दिलं आहे, की सर्वांना ५०० स्वे.फी चे मोफत घर मिळेलं. काँग्रेसला निवडणुकीत विजयी करा आणि १ बीएचके मिळवा, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसंच झोपडपट्टीमधील लोकांचे जीवन सुधारण्याचा आमचा संकल्प आहे, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्यावर विरोधांनी टीका केलीच. मात्र आता असंच काहीस ट्वीट संजय निरुपम यांनी केले आहे. त्यामुळे आता दानवेंनंतर निरुपम हे नवीन वादात सापडण्याची शक्यता आहे.