Sanjay Pawar | ‘कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी धोका दिलाय, उद्धव ठाकरे यांनी अशा गद्दारांवर विश्वास टाकू नये’; संजय पवारांचा कंठ दाटला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांनी (Shivsena MP) बंडखोरी (Rebellion) केली आहे. काल या खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद देखील घेतली. या 12 खासदारांमध्ये कोल्हापूरचे दोन खासदार आहेत. बंडखोर आमदारांना बेन्टेक्स म्हणून संबोधणारे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक (Kolhapur MP Sanjay Mandlik) हे सुद्धा काल एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. यावर कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी अतिशय उद्विग्न (Emotional) प्रतिक्रिया दिली, यावेळी संजय पवार (Sanjay Pawar) यांना अश्रू अनावर झाले होते.

 

शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने (MP Darhysheel Mane) यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्याने कोल्हापुरात शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. खासदारांनी उचलेल्या बंडखोरीच्या पावलाविरोधात येथील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिंदे गटात गेलेले बेनटेक्स आणि उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) असलेले शिवसैनिक सोने असे म्हणणारे खासदार संजय मंडलिक यांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया देताना जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) म्हणाले, उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच विश्वासघात केला. उद्धव साहेबांनी आता गद्दारांवर विश्वास टाकू नये. कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी धोका दिला आहे. ही प्रतिक्रिया देताना पवार यांना अश्रु अनावर झाले होते.

 

खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना आव्हान देताना संजय पवार म्हणाले, दोन्ही खासदार शिंदे गटात गेलेच आहेत तर माझे त्यांना आव्हान आहे,
जर त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा (Resignation) द्यावा आणि निवडणुकीच्या (Election) रिंगणात उतरावे.
त्यांना कोल्हापूरची स्वाभिमानी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

संजय पवार पुढे म्हणाले, मला धैर्यशील मानेंविषयी काही बोलायचे नाही.
कारण त्यांचा राजकीय प्रवासच राष्ट्रवादी (NCP), शिवसेना वगैरे असा आहे.
पक्षाशी एकनिष्ठ न राहण्याचा त्यांचा इतिहास आहे.
पण मला वाईट वाटते की जे आमच्याबरोबर बैठकीला उपस्थित राहून गद्दारांना धडा शिकवण्याचे प्लॅनिंग करत होते,
तेच मंडलिक आज बंडखोर गटाला जाऊन मिळाले आहेत.

 

संजय पवार पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच धोका दिला.
आता उद्धव ठाकरे यांनी अशा गद्दारांवर विश्वास टाकू नये. परत पक्षात स्थान देऊ नये.
ठाकरे कुटुंब आणि अवघी शिवसेना संकटात असताना मंडलिक असे वागूच कसे शकतात?

 

Web Title :- Sanjay Pawar | kolahpur shivsena sanjay pawar emotional after mp sanjay mandlik and dhairyashil mane join eknath shinde rebel group

  
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Kisan Samman Nidhi Yojana | जाणून घ्या केव्हा जमा होईल किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता, असे अपडेट करा KYC

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Pune Metro | पुणेकारांसाठी महत्वाची बातमी ! वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार