Sanjay Pawar | … तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी का गेला होतात? संजय पवारांनी संभाजीराजेंवर साधला निशाणा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होता येत नाही, असं म्हणणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेचे (Shivsena) पराभूत उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजेंचं ते विधान खेदजनक आहे. मला मतं द्या म्हणत तुम्हीच पाठिंब्यासाठी शिवसेनेकडे आला होतात. तुम्हाला कोण बोलवायला आलं नव्हतं. संभाजीराजेंचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच आहे, अशा शब्दात संजय पवार (Sanjay Pawar) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (BJP Candidate Dhananjay Mahadik) यांचा मोठा विजय झाला. यावरुन संभाजीराजे यांनी शिवसेनेला टोला लगावला. वाघाची कातडी ओढून वाघ होता येत नाही, अशी खरमरीत टीका संभाजीराजे यांनी तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ट्विट करुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. याच टीकेला संजय पवार (Sanjay Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी का गेला होता?
जर वाघाचं कातडं पांघरुन वाघ होता येत नाही. तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी तुम्ही का गेला होतात? मला मतं द्या म्हणत तुम्हीच पाठिंब्यासाठी शिवसेनेकडे गेला होतात. तुम्हाला कोण बोलवायला आलं नव्हतं. संभाजीराजेंचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच आहे. सर्कशीतले वाघ वेगळे असतात आणि जंगलातले वाघ वेगळे असतात. छत्रपती म्हणून तुमचा कायमच आदर राखत आलोय, इथून पुढेही राखेन. पण कृपा करुन आपण शिवसेनेवर टीका करु नये, असे संजय पवार यांनी म्हटले.
शेवटच्या क्षणी दगाफटका झाला
मी निवडून येण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी दगाफटका झाला. सेनेचा उमेदवार म्हणून नाही तर आपला महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केले असते तर निकाल काही वेगळा लागला असता, अशी खंत संजय पवार यांनी बोलून दाखवली.
शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने संभाजीराजे नाराज झाले आहेत, यापूर्वी सुद्धा त्यांनी आपली नाराजी ट्विटमधून व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी अभंगाचे दोन ओळी ट्विट केल्या होत्या. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ॥. याचा अर्थ वाघाचे कातडे पांघरून वाघ होता येत नाही, असा होता. संभाजीराजे यांनी अभंगाचा वापर करत थेट शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 11, 2022
Web Title :- Sanjay Pawar | Shivsena Leader sanjay pawar reply sambhajiraje chhatrapati over his criticism on shivsena
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update