Homeताज्या बातम्याSanjay Rathod | भाजपची कोंडी ? महाविकास आघाडी सरकारशी भांडून ज्यांचा घेतला...

Sanjay Rathod | भाजपची कोंडी ? महाविकास आघाडी सरकारशी भांडून ज्यांचा घेतला राजीनामा, त्याच राठोडांना केलं मंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मार्च महिन्यात राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वाक्षरी करुन राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे (Governor) पाठवला. राज्यपालांनीही हा राजीनामा तात्काळ मंजूर केल्याने संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे मंत्रिपद गेले होते. परंतु बंडखोरीनंतर आता राठोड यांना शिंदे गटाने (Shinde Group) मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे, भाजपने (BJP) ज्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. ते आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत मंत्री असणार आहेत.

 

आजच्या मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) यवतमाळ मधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता ते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहेत. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलन केलं होतं तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण (Pooja Chavan) हिच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यात गाजलं होतं.
पुण्यातील वानवडी (Vanavadi Pune) भागात इमारतीतून उडी घेऊन 8 फेब्रुवारी रोजी पूजाने आत्महत्या (Suicide) केली.
त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्याने व त्यात संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागलं होतं.
पूजा चव्हाणच्या आत्महत्येला संजय राठोड जबाबदार आहेत असा थेट आरोप करत भाजपच्या महिला आघाडीने कारवाईची मागणी केली होती.
त्यानंतर राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला होता.
त्यासाठी राज्यभरात आंदोलने करण्यात आली.
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता ते नव्याने मंत्री बनले आहेत.

 

दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्विट केलं आहे.
पुजा चव्हाणच्या (Pooja Chavan) मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणे हे अत्यंत दुर्दैवी  आहे.
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे.
माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

 

Web Title : – Sanjay Rathod | bjps dilemma shinde made sanjay rathore the minister who had fought with uddhav thackeray and resigned in case of puja chavan death

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News