×
Homeताज्या बातम्याSanjay Rathod | मंत्री संजय राठोडांनी मला 4 तास थांबवले, त्यांची देहबोली...

Sanjay Rathod | मंत्री संजय राठोडांनी मला 4 तास थांबवले, त्यांची देहबोली आणि वृत्ती…; बंजारा समाजाचे महंत शिवबंधन बांधणार

मुंबई : Sanjay Rathod | बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) चर्चेत आलेले बंडखोर आमदार आणि सध्या शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण बंजारा समाजाचा चेहरा म्हणून राठोड यांच्याकडे पाहिले जाते.

महंत सुनील महाराज हे शिवबंधन (Shivabandhan) बांधणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर महंतांनी स्वत: हा खुलासा केला आहे. महंत सुनील महाराज म्हणाले, बंजारा समाजाचे (Banjara Community) प्रश्न घेऊन, समाजहिताचे प्रश्न, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासाचे प्रश्न घेऊन मुंबईत गेलो असता बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेलो तिथे मिळालेली वागणूक ही न सांगण्यासारखी आहे. मला त्या कार्यालयात 4 तास थांबवून ठेवले. त्यानंतर भेट झाल्यानंतर मंत्र्यांनी 10 मिनिटेही वेळ दिला नाही. त्यांच्या देहबोली आणि वृत्तीवरून माझी उपस्थिती त्यांना खटकत असल्याचे दिसून आले.

महंत सुनील महाराज यांनी पुढे म्हणाले की, ज्यांच्यासाठी आपण सहकार्य केले, यानंतर माझे सामाजिक,
धार्मिक कार्यात माझे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत.
परंतु राजकीय मैदानात माझे आणि संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे संबंध राहणार नाहीत. बंजारा समाजासाठी, सत्तेत वाटा मिळण्यासाठी, बहुजन आणि बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व विधानसभेत करण्यासाठी मी शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर, राज्यातील बंजारा वोट बँक शाबूत ठेवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू आहे.
नुकतेच शिवसेनेच्या नेत्यांनी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा धर्मगुरू संत बाबुसिंग महाराज (Babusingh Maharaj)
यांच्यासह संत-महंतांची भेट घेत चर्चा केली होती.
बंजारा संत, महंतांची भेट घेण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे पोहरादेवीत जाणार आहेत.
त्यानंतर आता बंजारा समाजाचे महंत शिवबंधन बांधणार आहेत. हा मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का आहे.

Web Title :- Sanjay Rathod | mahant of banjara community sunil maharaj may join shivsena in presence of uddhav thackeray shock to sanjay rathod

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nilesh Rane | ‘पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही’, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Pune Crime | वाढदिवसाच्या पार्टीत आलेल्या कामगाराला चोर समजून बेदम मारहाण, 6 जण ताब्यात

Vitamin D deficiency | ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकते ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News