Sanjay Rathod | मंत्रीपदाचा राजीनामा का दिला?; संजय राठोड यांनी दिलं स्पष्टीकरण

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्टार टिक-टाॅक फेम पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (Pooja Chavan suicide case) शिवसेना नेते आणि राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर संजय राठोड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘राजीनाम्यासाठी माझ्यावर कोणाचाच दबाव नव्हता, परंतु शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेत मी स्वत:हून राजीनामा दिला, असा खुलासा करत, विरोधकांनीही अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. घटनेची पारदर्शक चौकशी होऊन सत्य बाहेर यावे म्हणून मी राजीनामा दिल्याचे देखील राठोड (Sanjay Rathod) यांनी म्हटलं आहे.

संजय राठोड (Sanjay Rathod) हे बंजारा समाजाच्या सहविचार सभेच्या निमित्ताने रविवारी सोलापूर (Solapur) दौऱ्यावर होते.
त्यावेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यात बंजारा समाजाची लोकसंख्या सुमारे दीड कोटींपर्यंत आहे.
288 विधानसभा मतदारसंघांपैकी 72 मतदारसंघांत समाजाची निर्णायक ताकद आहे.
समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, या आशेने आमचा लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे.

पुढे राठोड (Sanjay Rathod) म्हणाले, बंजारा समाजाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून न्याय मिळालेला नाही.
समाजातील तरुणांच्या भवितव्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे 25 मागण्या घेऊन आम्ही दौरे करत असल्याचे देखील संजय राठोड यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या अखत्यारित्यातील मागण्यांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितला असून त्यांनी लवकरच बैठक घेऊ, असं आश्वासन देखील दिलं असल्याचं ते म्हणाले.

Web Titel :- Sanjay Rathod | sanjay rathod comment on resignation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ZP Election | ओबीसी आरक्षणाशिवाय होणार ZP पोटनिवडणुका; राजकीय वातावरण तापणार

LIC Jeevan Labh Policy | ‘एलआयसी’ची जीवन लाभ पॉलिसी देईल मोठा फायदा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळतात ‘लाभ’

Pune NCP Nokari Mohastav | पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘नोकरी महोत्सवा’त 700 बेरोजगारांना नोकरी