पूजा चव्हाण प्रकरण : पोहरादेवी महंतांचा संदेश – ‘संजय राठोड यांनी चौकशीला सामोरे जावे’

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. सध्या ते संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यानंतर ते पोहरादेवी मंदिरात पोहोचले आहेत. मात्र, त्यांच्यासोबत हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. त्यादरम्यान, येथील पोहरादेवी पीठाने संजय राठोड यांनी चौकशीला सामोरे जावे, असा संदेश दिला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर ते गेल्या 15 दिवसांपासून गायब होते. मात्र, आज ते पोहरादेवी मंदिरात पोहोचले. त्यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिस चौकशीला सामोरे जावे, अशा सूचना दिल्या आहेत. याबाबतची माहिती जितेंद्र महाराज यांनी दिली. पूजा चव्हाण हिला दोनवेळा पीठावरून श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, याप्रकरणाचे राजकारण करू नका. तिच्या पालकांनीच आत्महत्या का केली आहे, याबाबत सांगितले. संजय राऊत यावर आज बोलतील. तसेच ते फक्त दर्शनासाठी आले आहेत.

…तोपर्यंत राठोड दोषी नाहीत

जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही आणि राठोड हे दोषी आढळत नाहीत. तोपर्यंत बंजारा समाज त्यांना दोषी धरणार नाही. तसेच आम्ही या प्रकरणी चौकशीला सामोरे जाण्यास त्यांना सांगू, असेही जितेंद्र महाराज म्हणाले.

कोरोनाविषयक नियमावलीचे उल्लंघन

संजय राठोड जेव्हा पोहरादेवी मंदिरात पोहोचले. तेव्हा हजारो समर्थकांनी त्यावेळी गर्दी केली होती. त्यांच्याकडून कोरोनाविषयक नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले होते.