Video : संजय राठोड पोहरागडावर पोहचले अन् समर्थकांवर जोरदार लाठीचार्ज

वाशिम : पोलीसनामा ऑनलाईन  –  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्याने गेल्या 15 दिवसांपासून गायब असलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड अखेर मंगळवारी (दि. 23) सर्वासमोर आले. वनमंत्री राठोड हे पोहरागड इथे पोहरादेवीच्या दर्शनासाठी दाखल होताच त्यांना समर्थन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कोरोना संसर्गामुळे गर्दी होऊ देऊ नका, अशी सूचना पोलीसांकडून दिली असतानाही समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.

संजय राठोड हे यवतमाळ येथून सकाळी 9 वाजता बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघाले होते. साधारण 80 किमी अंतरावर असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी संजय राठोड यांच्या सोबत कुटुंबीय व स्थानिक नेतेही आहेत. पोहोरादेवी येथे पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत कोण आला रे कोण आला रे, बंजारा समाजाचा वाघ आला अशा घोषणा दिल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.