भाजपाला 72 तास तर शिवसेनेला 24 तासात, भाजपाचे ‘षडयंत्र’ असल्याचा शिवसेनेचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला सरकार स्थापन करण्याबाबत निमंत्रण देताना निर्णय घेण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली होती. मात्र, शिवसेनेला केवळ २४ तासांची मुदत दिली आहे. शिवसेनेविरोधात भाजपाचे हे षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत यांनी सांगितले की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देणे, ५० -५० फॉर्म्युल्यावर ठाम न राहणे, मग विरोधी पक्षातदेखील बसू हा जनतेचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने केंद्रीय मंत्री राजीनामा देत आहे. एका मंत्रिपदासाठी अशा खोट्या वातावरणात का राहावे ?. महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झालं ते दुर्दैवी असून त्यासाठी भाजपाच जबाबदार आहेत. जे ठरले आहे त्यावरुन बोलण्यास तयार नाही तर कोणते नाते आहे. असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.

राज्यपालांनी शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली तर भाजपाला ७२ लाखांची मुदत दिली आहे, हे समजून घेतले पाहिजे. सरकार बनविणे आमचे कर्तव्य आहे. जास्त मुदत मिळणे गरजेचे आहे. मात्र, राज्याला राष्ट्रपती राजवटीपर्यंत ढकलायचे हे षडयंत्र रचले जात आहे. ज्या घटनात्मक तरतूदीनुसार काम करता येईल ते करणार आहोत. आमच्या भूमिका राज्यपालांकडे मांडणार आहोत. शिवसेनेवर राज्यपालांनी सरकार बनविण्याचे निमंत्रण दिले आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सरकार बसविण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Visit : Policenama.com