Sanjay Raut And Vasant More | पुण्यात संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्यात भेट; ‘तात्यां’ च्या कामाचं केलं तोंडभरुन कौतुक !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut And Vasant More | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Chief MNS Raj Thackeray) यांनी मशिदींवरील घेतलेल्या भूमिकेनंतर पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आल्याचे दिसले. त्यानंतर वसंत मोरेंच्या पक्ष बदलाची चर्चा देखील पसरली होती. मात्र मोरे यांनी मनसेतच राहणार असल्याचं स्पष्ट केल्यानं या वृत्ताला पूर्णविराम मिळाला. दरम्यान, आता शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) आणि वसंत मोरे यांच्यात भेट झाली आहे. पुण्यात एका लग्नसोहळ्या दरम्यान ही भेट घडून आली. या भेटीमुळे मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Sanjay Raut And Vasant More)

 

या भेटीमध्ये मात्र संजय राऊत यांनी वसंत मोरे यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. थोडा वेळ या दोघात संवाद झाला. “तुम्ही खूप भारी काम करताय’, अशी स्तुती संजय राऊत यांनी केली आहे. यादरम्यान राऊतांनी वसंत मोरे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. वसंत तात्यांनीही राऊतांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. काही वेळाच्या भेटीनंतर ‘पुन्हा भेटू” म्हणत दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला. (Sanjay Raut And Vasant More)

दरम्यान, वसंत मोरे गेल्या काही महिन्यांपासून मनसेत नाराज आहेत. मनसेच्या भोंग्या विरोधातल्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग नव्हता. राज ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी भोंगेविरोधी आंदोलनाला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. त्याचमुळे महाराष्ट्र भर वसंत मोरे यांची चर्चा झाली. दरम्यानच्या काळात त्यांना अनेक पक्षांनी ऑफर दिल्या. मात्र मी मनसेतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे. त्याचबरोबर वसंत मोरेंना आणखी एकदा शिवसेनेत येण्याची तर ऑफर नाही ना ? अशा चर्चांना उत आला आहे.

 

 

Web Title :- Sanjay Raut And Vasant More | sanjay raut and vasant more meet in pune shivsena mp appreciate mns leader vasant more’s work

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा