100 कोटीच्या दाव्यावर ‘आर-पार’, संजय राऊत म्हणाले – ‘राष्ट्रपती शासनाबाबत विचार जरी केलात तर…’

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली असताना सोमवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर सुरू असलेल्या भाजपाच्या गोंधळावरून संजय राऊत यांनी म्हटले की, जर सरकार योग्य चौकशीसाठी तयार आहे, तर वारंवार राजीनाम्याची मागणी का होत आहे.

संजय राऊत यांनी आरोप केला की, मोदी सरकारकडून केंद्रीय एजन्सीजचा चुकीच्या पद्धतीने वापर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु जे असे पाऊल उचलत आहेत त्यांच्यासाठी ते चांगले ठरणार नाही. असा विचार जरी केला तरी मी त्यांना इशारा देतो की, ही आग त्यांना सुद्धा जाळून टाकेल.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, जर एनसीपी प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे की अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप आहेत, त्यामध्ये तथ्य नाही तर त्याची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊत म्हणाले की, जर आम्ही सर्वांचे राजीनामे घेत राहिलो तर सरकार चालवणे अवघड होईल.

संजय राऊत म्हणाले, जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत सर्व प्रकरणांची अतिशय योग्यपद्धतीने चौकशी केली जाईल. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली जात आहे, विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे.

केंद्रावर राऊतांचे शरसंधान
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधताना म्हटले की, केंद्रीय एजन्सीजना महाराष्ट्रात पाठवण्याचा प्रयत्न होत आहे, आम्ही एनआयएला सहकार्य करत आहोत. सुशांत केसमध्ये जेव्हा सीबीआयने एंट्री केली, तेव्हा परमबीरच आयुक्त होते. परंतु सीबीआय काहीही बाहेर काढू शकली नाही.

संपर्ण प्रकरणावर संजय राऊत म्हणाले की, तिन पक्षांमध्ये जे ठरले आहे, त्यानुसार अंतिम निर्णय कॅबिनेटच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांद्वारे घेतला जाईल. संजय राऊत यांनी पुन्हा सांगितले की, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही, सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल.