Sanjay Raut | संजय राऊतांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर BJP कडुन पुण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Sanjay Raut | शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. ‘आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, तर थेट कोथळा बाहेर काढतो’, राऊत यांनी वादग्रस्त विधान केलं या आरोपावरुन भाजप (BJP) आता आक्रमक झाला आहे. त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपाकडून पुण्यात (Pune) गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी केली जातेय. या विधानावरुन पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) लेखी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरु आहे. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, समोरून थेट कोथळा काढतो, त्याबद्दल शिवाजी महाराजांना अटक केली असती का? संजय राऊतांच्या या विधानावरुन राजकिय वातावरण तापलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कथित वक्तव्यावरुन संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपला (BJP) प्रत्युत्तर दिले होते. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही.
थेट समोरून वार करून कोथळा बाहेर काढतो. पण कोथळा काढण्याच्या वक्तव्यावर भाजपनं आक्षेप घेतला असून पुण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, केवळ ‘मी थोबाडीत मारली असती’ या राणेंच्या वक्तव्यावर त्यांना अटक करण्यात आली होती.
याचा विचार केला तर संजय राऊतांचं (Sanjay Raut) विधान भयंकर आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, संजय राऊतांना विचारलं असता, त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत सांगितलं आहे.
मी असं काय केलं आहे की तक्रार दाखल करावी. कोणाचा कोथळा बाहेर काढू असं म्हटलंय? ते पाठीत खंजीर खुपसत होते. पाठीत खंजीर खुपसण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही.
आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केले आहेत.
त्यामुळे समोर कोथळा बाहेर काढतो, त्याबद्दल शिवाजी महाराजांना अटक केली असती का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
यावरुन आता भाजपा आक्रमक झाला आहे. तसेच, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

Web Title : Sanjay Raut | bjp demand fir against shivsena mp sanjay raut for controversial statement on shivaji maharaj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Phone Tapping case | वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्लांचं ‘एफआयआर’ मध्ये नावचं नाहीय

Pune Crime | जेवणामधून गुंगीचे औषध देऊन चोरी; पुणे पोलिसांकडून महिलेला तामिळनाडूतून अटक

Thackeray government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना टोल माफ