Sanjay Raut | ‘भाजपाकडून केवळ मतांच्या राजकारणासाठी वीर सावरकरांचा वापर’ – संजय राऊत

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या देशात तक्रारी दाखल करणे, आणि तक्रारींच्या आधारावर प्रसिद्धी मिळविणे, हा राजकीय उद्योग झाला आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) बोलत होते. वीर सावरकरांचा मुद्दा महत्वाचा आहे. वीर सावरकरांबद्दल आम्हाला आदर आहे. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. वीर सावरकांची कोणत्याही प्रकारची बदनामी आणि वक्तव्य आणि आम्ही सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्यावर आमचा विषय संपतो, असे यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

तसेच देशात भाजपमध्ये मोठे सावरकरप्रेमी निर्माण झाले आहेत. वीर सावरकर (V. D. Savarkar) हे भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) श्रद्धास्थान कधीच नव्हते. तसा इतिहास आहे. त्यामुळे ते सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी उचलून धरत नाहीत. त्यांनी केवळ मतांच्या राजकारणासाठी वीर सावरकरांचा वापर केला आहे. त्यांनी त्यांच्या राजकारणासाठी वीर सावरकांचा विषय घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून सावरकरांच्या विचारांचा पुरस्कार केला आहे, असे संजय राऊत म्हणाले.

त्याचबरोबर काँग्रेसच्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो
(Bharat Jodo Yatra) यात्रेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्रात देखील मोठा प्रतिसाद या यात्रेला मिळाला. पण, यावेळी वीर सावरकरांचा मुद्दा काढण्याची राहुल गांधी यांना गरज नव्हती. भाजप देशाला गुलाम करण्याच्या वाटेवर आहे. देश हुकुमशाहीच्या वाटेने वाटचाल करत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात ही यात्रा आहे. वीर सावरकरांच्या अपमानामुळे शिवसेनेसोबत काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला आहे. त्यांच्या बद्दल देशातील मोठ्या वर्गाला आदर आहे. त्यामुळे त्यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्यात यावा अशी आमची मागणी आहे, असे देखील यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.

Web Title :- Sanjay Raut | ‘BJP’s use of Veer Savarkar only for vote politics’ – Sanjay Raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Leader Ranjit Deshmukh | काँग्रेसच्या ज्येष्ठ माजी मंत्र्याची मुलगा आणि सूनेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

Mumbai Railway Megablock | लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी; मुंबईच्या मध्य रेल्वे लाईनवर 27 तासांचा मेगाब्लॉक

Pune Crime | अंबामातेची चांदीची मुर्ती, हार, निरांजन आणि दागिने चोरणाऱ्या मोलकरीणीला कोरेगाव पोलिसांकडून अटक