Sanjay raut | ‘जर पंतप्रधानांचा अपमान म्हणजे गुजरातचा अपमान, तर…’ – संजय राऊत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या पक्षात राहणे योग्य नाही, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उदयनराजे भोसले यांना भाजपचा राजीनामा देण्याचे आवाहन केले आहे. खासदार उदयनराजेंनी मुंडकं छाटण्याची भाषा करण्याऐवजी सगळ्यात आधी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला हवा, असाही सल्ला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला.

 

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘(भाजपने) उदयनराजेंच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी मुंडकं छाटण्याची भाषा केली आहे. अशी भाषा म्हणजे संताप असतो. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत भावना खूप तीव्र आहेत. उदयनराजे भोसले यांच्या वाणीतून त्या भावनांचा स्फोट होत असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. उदयनराजे भोसले सातारच्या गादीचे छत्रपती आहेत, तर संभाजीराजे कोल्हापूरचे छत्रपती आहेत. त्यामुळे त्यांच्या मनातील चीड बाहेर येणे स्वाभाविक आहे.’

त्यासोबतच, ‘मुंडकं छाटण्याची भाषा न करता सगळ्यात आधी उदयनराजेंनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे. या (भाजप) पक्षाने आमच्या दैवताचा अपमान केला आहे. आज, त्या अपमानाचे समर्थन केले जातेय. अशा वेळी भाजप पक्षात राहणे योग्य नाही. त्यांनी भाजपमध्ये राहता कामा नये. शिवसेना उदयनराजेंसोबत आहे. भाजपमध्ये शिवप्रेमी असतील, त्यांना छत्रपतींबद्दल आस्था, प्रेरणा असतील, तर त्यांनी ताबडतोब राज्यपालांचा राजीनामा घेतला पाहिजे. सुधांशू त्रिवेदीची हकालपट्टी केली पाहिजे. पण हे होत नाही,’ असेही राऊतांनी सांगितले.

 

दरम्यान, ‘छत्रपतींच्या महाराष्ट्राची बदनामी केली जातेय.
पंतप्रधानांना रावण म्हटल्यावर हा गुजरातच्या जनतेचा अपमान आहे, असे मोदी म्हणतात.
मग महाराष्ट्रात छत्रपतींचा अपमान होत असेल, तर हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनेचा उदयनराजेंशी संवाद सुरू आहे. लवकरच त्याबाबत कृतिशीलता दिसेल, असे सूचक विधानही संजय राऊतांनी केले आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | chhatrapati udayan raje bhosale resigns bjp sanjay rauts advice

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Govt | आधी मंत्रिमंडळ विस्तार, की महामंडळ वाटप? शिंदे – फडणवीसांकडून लवकरच मोठा निर्णय

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंवर त्यांचे आमदार नाराज; ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं

Siddarth Jadhav | सिद्धार्थ जाधवच्या येण्याने घरात निर्माण होणार टेन्शनचे वातावरण; कारण सिद्धार्थ जाताना…..