Sanjay Raut | ‘शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केलं, त्याचीच फळे भोगत आहेत’, शिंदे गटातील आमदाराचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर ईडीने (ED) छापा मारला. यावेळी त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन कागदपत्रे आणि साडे अकरा लाख रुपयांची रोकड पथकाने जप्त केली. जप्त केलेल्या रक्कमेपैकी (Amount Forfeited) दहा लाख रुपयांची रक्कम ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde  यांच्या नावावर असल्याचे समोर आले. यावरुन शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे.

 

संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊतांवर (Sanjay Raut) जी कारवाई सुरु आहे ती मागील 4 – 5 महिन्यापासून सुरु आहे. त्यांना ईडीने अनेकवेळा नोटीस पाठवली. काही नोटिसींना ते गैरहजर राहिले. ईडीने कायदेशीर प्रक्रियेतून (Legal Process) ही कारवाई केली. संजय राऊत यांच्या घरी जे पैसे सापडले ते समजून जा शिंदेंनी दिले. अयोध्याला जाऊन किती महिने झाले ? तुम्ही हे पैसे पक्षाला परत करायचे होते ? याचा अर्थ संजय राऊतांना ते पैसे ठेवायचे होते, असा टोला शिरसाट यांनी राऊतांना लगावला.

 

राऊतांना त्यांची लायकी आज कळेल

संजय शिरसाट पुढे म्हणाले, ईडीने कारवाई केल्यानंतर राऊत जे हातवारे करत होते ते अतिशय चुकीचे होते. ईडीची कारवाई सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर ही झाली. मात्र अशा अविर्भावात ते वागले नाहीत. संजय राऊतांना त्यांची लायकी आज कळेल. ज्यांच्या नादी लागून संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्या कर्माची फळे आहेत. राऊत हा त्यांचा प्यादा होता या प्याद्याचे काम आता संपले आहे. शिवसेना फोडण्याचं काम राऊतांनी केले. ते शिवसेनेसोबत होते की राष्ट्रवादीसोबत (NCP) हे महाराष्ट्राला माहित होते, असं शिरसाट म्हणाले.

 

राऊतांसारखे कडवट शिवसैनिकांना विकायला निघाले

अनेक कडवट शिवसैनिक ज्यांना पक्षामध्ये काहीच मिळाले नाही. ते बाळासाहेबांना दैवत मानून जगले.
आज त्या शिवसैनिकांना त्रास होतोय. राऊत सारखे लोक अशा कडवट शिवसैनिकांना विकायला निघालेत.
नाशिक मध्ये जाऊन पहा, त्यांच्याबद्दल काय बोलले जाते. तुम्ही फक्त सामनात छापू शकता मात्र जनतेच्या मनावर छापू शकत नाही.
तुम्ही शिवसेना फोडली त्या पापाची फळे भोगावी लागत असल्याचे म्हणत शिरसाट यांनी राऊतांवर घणाघात केला.

 

Web Title : –  Sanjay Raut | cm eknath shinde rebel group mla sanjay shirsat reaction on sanjay raut arrested by ed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा