Sanjay Raut । राज्य सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले शिवसेनेचे  आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब नंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरून अनेक चर्चा रंगू लागल्या असतानाच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आणखी एक प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सर्व, काँग्रेस आणि राष्ट्रवादी-काँग्रेस मुख्यमंत्री यांच्या पाठिशी आहोत. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहे. या सरकारची पाच वर्षांची वचनबद्धता आहे. आम्ही पाच वर्ष पूर्ण करु, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Letter bomb of Pratap Sarnaik । आमदार प्रताप सरनाईक यांना भाजपानं गळ टाकल्याची चर्चा

संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. राज्य सरकार पाच वर्ष चालणार आहे. ही तिन्ही पक्षांची वचनबद्धता आहे. तिन्ही पक्षांमधील समन्वय देशासाठी आदर्श आहे. तसेच, कॉमन मिनिमम प्रोग्राम हा या सरकारचा पाया आहे. असं राऊत  म्हणाले. प्रताप सरनाईक हे आमचे आमदार आहेत. आज सीबीआय आणि ईडी त्यांच्या मागे आहे. त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. आमचा पक्ष आणि मुख्यमंत्री प्रत्येकजण प्रताप सरनाईकांच्या पाठीशी उभे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

स्वबळावरून शिसवेनेचा कॉंग्रेसवर निशाणा, म्हणाले – ‘फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घ्या’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेना काम करत आहे. शिवसेनेला गटबाजीनं पोखरलेलं नसल्याचं म्हणत शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरेंचा एकच गट, असं म्हणत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आमच्यामध्ये मतभेद निर्माण करण्यास कोणीही यशस्वी होणार नाही. दबाव डावपेच घडताहेत. ते सीबीआय, ईडी वापर करतात. परंतु, ते महाविकास आघाडीत फूट पाडण्यात यशस्वी होणार नाहीत. ही त्यांची निराशा आहे असा टोला देखील राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

प्रताप सरनाईकांनी लिहिलेल्या पत्रात काय आहे?

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
या पत्रात त्यांनी ‘भाजपशी हात जुळवून घ्यावे, भविष्यात तेच चांगले राहिल’ अशी विनंती केल्यामुळे शिवसेनेत आणि राज्यात खळबळ उडाली.
या पत्रामुळे अनेक सवाल उपस्थित झाले.
याचबरोबर अनेक राजकीय वरिष्ठांच्या प्रतिक्रिया यावर उमटू लागल्या आहेत.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : sanjay raut | congress ncp shivsena we all are standing with cm said sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update