Sanjay Raut | संगीत सोहळयात वधूपिता संजय राऊतांचा सुप्रिय सुळेंसोबत ‘डान्स’, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत विवाहबंधनात अडकत आहेत. पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वधूपिता संजय राऊत (Sanjay Raut ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यासोबत केलेला भन्नाट डान्सने (Dance) सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा सोमवारी (दि.29) विवाह होणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी (Thane District Collector) राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांचे चिरंजीव मल्हार यांच्यासोबत पूर्वशी हीचा विवाह होणार आहे. लग्नाआधी आयोजित संगित कार्यक्रमात (music program) सर्वच उपस्थितांनी ठेका धरला. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या कुटुंबासह हजर होत्या.
संगीत कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना डान्स करण्यास भाग पाडेल.
दोघांच्या डान्सने सर्वाचे लक्ष वेधून घेतलं.
एवढेच नाही तर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आग्रहामुळे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना देखील ठेका धरावा लागला.
राजकारणाच्या पलिकडे राऊत आणि पवार कुटुंबात नेहमीच स्नेहाचा संबंध राहिले आहेत.
दरम्यान, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अनेकांनी दोघांच्या डान्सची तारीफ केली आहे.
Web Title :- Sanjay Raut | Dance with Supriya Sule of Sanjay Raut at music ceremony, video goes viral on social media (Video)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, तीन ट्रक एकमेकांना धडकले