Sanjay Raut | नोटबंदी निर्णयावर संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Raut | नुकताच नोटबंदीबाबत घेतला गेलेला मोदी सरकारचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. त्यावर देशात नोटबंदी जाहीर झाल्यानंतर हजारो लोकांचे मृत्यू झाले. त्यामुळे नोटबंदीच्या निर्णयावर जे मत प्रकाश आंबेडकरांनी मांडलं त्यांच्याशी मी सहमत आहे. असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडले आहे.

 

तसेच, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनीही जो उद्रेक आणि आर्थिक हत्याकांड झालं त्याचा निषेध केला. नोटबंदीमुळे हजारो लोक बँकेच्या रांगेत मरण पावले. नोटबंदीमुळे बेरोजगारीही निर्माण झाली असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नोटबंदीचा निर्णय योग्यच होता असा निर्णय सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिला. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत यांनी हे उत्तर दिलं आहे. लाखो लोकांना रोजगार गमावावा लागला. नोटबंदी दरम्यान लाखो लोकांचे अतोनात हाल झाले असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

 

जाणून घेऊया नक्की काय म्हणाले संजय राऊत?
नोटबंदीवर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आम्ही हा प्रश्न विचारत नाही की नोटबंदी योग्य की अयोग्य. जे आर्थिक हत्याकांड नोटबंदीच्या निर्णयामुळे झालं त्याला जबाबदार कोण? हा आमचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला अचानक येऊन सांगितलं की आज रात्रीपासून १००० आणि ५०० रूपयांच्या नोटा बाद. काळा पैसा बंद होईल, टेरर फंडिंग बंद होईल, अतिरेक्यांना पैसे पुरवणं बंद होईल, चलनातल्या बनावट नोटा संपुष्टात येतील यासाठी आपण ही नोटबंदी करत आहोत अशी सगळी कारणं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. मात्र बनावट नोटांचं प्रमाण वाढलं आहे. काश्मीरसह देशभरात दहशतवाद संपलेला नाही. त्यांना करण्यात येणारं टेरर फंडिंग सुरूच आहे. असा घणाघात यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केला आहे.

तसेच यावर पुढे बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, नोटबंदीनंतर काळा पैसा जास्त प्रमाणात वाढला आहे.
त्यामुळे नोटबंदी योग्य कशी? असा सवाल करत पुढे राऊत म्हणतात, त्यामुळे जस्टिस नागरत्ना यांनी जे मत मांडलं ते
योग्य मत आहे आम्ही त्या एका मताच्या बाजूने आहोत.
आज (दि. ३ जानेवारी) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना नोटबंदीविषयी प्रश्न विचारला गेला
त्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं आणि नोटबंदीवर त्यांनी हे तर आर्थिक हत्याकांड आहे असं देखील म्हटलं आहे.
तसंच या हत्याकांडाला जबाबदार कोण असाही प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

 

काल याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालावर प्रकाश आंबेडकरांनी या निर्णयाबाबतची भूमिका स्पष्ट केली होती.
त्यात ते म्हणाले होते की, ‘रिझर्व बँक ऑफ इंडियाने १० मार्च २०१७ रोजी
त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे असे म्हटले आहे.
तथापि सर्वोच्च न्यायालयाने २०१६ च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या
नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही.’
त्यानंतर त्यांच्या या भूमिकेचे समर्थन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

 

Web Title :- Sanjay Raut | demonetisation is a financial carnage who is responsible for the victims standing in queues sanjay rauts attack on modi govt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाल्या-‘दादा नेमकं काय म्हणाले हे शांतपणे ऐकून घेतलं तर…’

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने ग्रुप अ‍ॅडमिनची जीभ कापली

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप