स्वतःला शिवसैनिक म्हणवणार्‍यांनी आमचे ‘संस्कार’ घ्यावेत, शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेवरुन चांगलाच पेच निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रिपदासाठी दावा करण्यात येत आहे. एक पक्ष आपल्या कोर्टातून चेंडू दुसऱ्या पक्षाच्या कोर्टात टोलावत आहे तर दुसरा पहिल्याच्या. रोज भाजप नेते विविध दावे करत आहेत तर शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी संजय राऊत खमके उभे दिसत आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजपवर सणसणीत निशाणा साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत आणि हे उद्धव ठाकरेंनीच सांगितले आहे, त्यामुळे राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळेल अशा भावनिक खेळ करणाऱ्या भाजप नेत्यांवर संजय राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की शिवसैनिक रोज खोटं बोलत नाही, तर दिलेल्या शब्दाला जागतो, वचनाला जागतो.

संजय राऊत म्हणाले की सत्तेसाठी, खुर्चीसाठी तो खंजीर खुपसत नाही. प्राण जाए पर वचन न जाए, हा आमच्यावरचा बाळासाहेबांचा संस्कार आहे. त्यामुळे कुणी स्वतःला शिवसैनिक म्हणवत असेल तर त्याने शिवसैनिकांचे संस्कारही समजून घ्यावेत असे म्हणत संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला.

राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी सत्ता कोणाची आणि कोण मुख्यमंत्री यावर संभ्रम आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील दोनदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीत काँग्रेसचे चाणाक्य अहमद पटेल आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट झाली. त्यामुळे पुढे काय होणार यावर अजून स्पष्टता नाही.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके