Sanjay Raut ED Raid | ‘संजय राऊत स्ट्राँग आहेत, ईडीला घाबरणार नाहीत’, शिंदे गटाच्या नेत्याला राऊतांवर विश्वास; चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षाची बाजू एकहाती लावून धरणारे खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी सातच्या सुमारास ईडीने धाड (Sanjay Raut ED Raid) टाकली. संजय राऊत यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या टीकेमुळे दुखावलेले भाजप (BJP) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) नेते आता त्यांच्यावर तुटून पडले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत (Sanjay Raut ED Raid) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

 

मात्र, संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर (Sanjay Raut ED Raid) शिंदे गटातील नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर चर्चांना उधाण आले आहे. रामदास कदम म्हणाले, संजय राऊत हे ईडीला कधीच घाबरणार नाहीत, ते ईडीच्या चौकशीला निर्भयपणे सामोरे जातील, असे कदम म्हणाले. आता त्यांच्या या वक्तव्यामागे कौतुक होते की खोचकपणा होता, हा प्रश्न आहे. राऊतांच्या घरावर ईडीने धाड टाकल्यानंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, संजय राऊत आणि माझ्यात अजूनही डायलॉग सुरुच आहे. मी त्यांना म्हटलं होतं की आतातरी तुम्ही थांबाल का ? बघा थांबता आलं तर, असे मी राऊत यांना म्हटल्याचे कदम यांनी सांगितले.

 

संजय राऊत हे कोणालाच भीत नाहीत. भीती त्यांच्या मनाला कधीच स्पर्श करत नाही. ईडी, सीडी किंवा पीडी असू दे संजय राऊत हे कोणालाही घाबरणारे नाहीत. ते सगळ्यांना सामोरे जातील. राऊतांनी भ्रष्टाचार (Corruption) केला नसेल, ते चोख असतील तर त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. ते या सगळ्यातून सहीसलामत सुटून बाहेर येतील. संजय राऊत तेवढे सक्षम आहेत, असेही कदम म्हणाले.

 

ईडीची राऊत यांच्या घरावर धाड

पत्राचाळ प्रकरणात ईडीचे पथक आज सकाळी सात वाजता संजय राऊतांच्या घरी दाखल झाले.
सध्या शोधमोहिम आणि चौकशी सुरु आहे.
दरम्यान, राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे.
यापूर्वी ईडीने संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती.
मात्र संसदेचं अधिवेशन (Parliament Session) असल्याचे सांगत राऊत ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते.
तसेच ईडीकडे मुदतवाढही मागितली होती. मात्र, आज अचानक ईडीचे अधिकारी राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाले.

 

Web Title : –  Sanjay Raut ED Raid | CM eknath shinde camp ramdas kadam reaction on sanjay raut ed raid mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा