Sanjay Raut | गोव्यात महाविकास आघाडी एकत्र का लढणार नाही? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवारी पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोव्यात (Goa Assembly Election) काँग्रेसने (Congress) महाविकास आघाडी करण्यास नकार दिल्याने गोव्यात महाविकास आघाडी होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना नेते आणि खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी का होऊ शकली नाही याचा खुलासा केला आहे.

 

गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट एकत्र बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमुळे यशस्वी होऊ शकला नसल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. गोव्यातील काँग्रेसच्या (Goa Congress) स्थानिक नेत्यांना आपला पक्ष राज्यात अजूनही मजबूत आहे, आपण बहुमताने सत्तेत येऊ, अशी आशा आहे. त्यामुळेच त्यांना सत्तेत वाटेकरी नकोत, असे काँग्रेस नेत्यांच्या एकंदर बोलण्यावरुन जाणवले. शिवसेना आणि राष्ट्रवादीने (NCP) मागितलेल्या जागा सोडण्यासही काँग्रेस नेत्यांनी नकार दिला. त्यामुळे भविष्यात उगाच ताणतणाव नको म्हणून शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. आमच्याकडे 15 ते 16 जागांवर चांगले उमेदवार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

 

आमच्या आशा अजूनही कायम
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी गोव्यातील महाविकास आघाडीची बोलणी पूर्णपणे फिसकटली नसल्याचे स्पष्ट केले. आमच्या आशा अजूनही कायम आहेत. ही निवडणूक आम्ही एकत्रीत लढववी, या मताचा मी आहे. गोव्यात काँग्रेसचे नेते शिवसेनेला 2-3 जागा देण्यास तयार झाले होते. यामध्ये पर्वरीच्या जागेचा समावेश होता. पण शिवसेनेला महाराष्ट्राच्या सीमेला (Maharashtra Border) लागून असलेल्या म्हापसा (Mhapsa), पेडणे (Pedne) आणि सावंतवाडीच्या (Sawantwadi) जागांसाठी अग्रही होती. मात्र काँग्रेसने या ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे आम्ही काँग्रेसला निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्याचे राऊत यांनी सांगितले.

राष्ट्रवादीला दाभोळीची जागा हवी होती
महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दाभोळीची (Dabholi) जागा हवी होती.
यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते.
परंतु काँग्रेसने त्याला नकार दिल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

काँग्रेस ‘त्या’ जागा जिंकणार नाही
गोव्यातील काँग्रेस नेत्यांच्या विषयी बोलताना संजय राऊत यांचा नाराजीचा सूर दिसून आला.
मी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या संपर्कात आहे.
मात्र, गोव्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते हायकमांडला वेगळी माहिती देत असतील.
ती पूर्णपणे सत्य नाही. आम्ही काँग्रेसला गोव्यात गेल्या 50 वर्षात एकदाही न जिंकता आलेल्या जागा मागितल्या होत्या.
काँग्रेस या निवडणुकीत त्या जिंकू शकणार नाही.
त्यामुळे अजूनही एकत्र लढावे याच मताचा मी असल्याचे राऊत यांनी म्हटले.

 

Web Title :-  Sanjay Raut | goa election 2022 mahavikas aghadi alliance not happned in goa because of congress regional leaders says shivsena mp sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IPS Asim Arun Profile | 28 वर्षांच्या दमदार कारकिर्दीनंतर यूपीचे IPS असीम अरुण यांची राजकारणात एन्ट्री, जाणून घ्या कोणत्या सीटवरून लढवणार निवडणूक

 

EPFO Update | जर केले नाही ईपीएफ खात्याशी संबंधीत ‘हे’ काम तर तुम्ही पाहू शकणार नाही अकाऊंट पासबुकच्या डिटेल

 

Confirmed Railway Ticket | खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल ट्रेनचे कन्फर्म तिकिट, जाणून घ्या पद्धत